
_JPG.jpg)
"Creativity is the key to success in the future, and primary education is where teachers can bring creativity in children at that level."
Dr. APJ Abdul Kalam
Dec 06, 2011
Distinguished Guest at Somalwar Centenary Celebrations.

सोमलवार हायस्कूल व ज्यु. कॉलेज, रामदासपेठ येथे इयत्ता सातवीत शिकणारी कु. स्पृहा तुषार शिनखेडे हिने पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे . ती संपूर्ण भारतातील १५ लाख विद्यार्थ्यांपैकी एक गौरवशाली विजेत्री आहे जिला “कौन बनेगा करोडपति “ या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०० वाजता Sony Live या वाहिनीवरुन झाले. केबीसीच्या प्राथमिक फेरीसाठी संपूर्ण भारतातून आलेल्या १५ लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त १० विद्यार्थ्यांना fastest finger first च्या माध्यमातून hot seat वर जाण्याची संधी मिळाली . एकानंतर एक सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत स्पृहाने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेचे आणि प्रसंगावधानाचे अद्भुत प्रदर्शन केले. या कार्यक्रमात स्पृहाला महानायक श्री . अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अनेक बक्षिसे प्रदान करण्यात आली तसेच २५ लाख रुपयाचे रोख पारितोषिक तिने प्राप्त केले . विशेष उल्लेखनीय म्हणजे याप्रसंगी स्पृहाने म्हटलेल्या भगवद्गीतेतील श्लोकांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले . तसेच केबीसीच्या कार्यक्रमात स्पृहाला ‘SHLOKA QUEEN’ हे नाव देण्यात आले. तिने अर्थासह उत्तम उच्चारण करून सादर केलेल्या या श्लोकामुळे महानायक श्री . अमिताभ बच्चन देखील प्रभावित झाले. अभ्यासात नेहमीच अव्वल असणारी स्पृहा, भगवदगीता पठण, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, कथाकथन अशा विविध स्पर्धांमध्ये सतत सहभागी होवून पारितोषिके मिळवत असते. यावर्षी HOMIBHABHA JUNIOR SCIENTIST या राष्ट्रीय स्तरावरच्या प्रज्ञा शोध परीक्षेत तिने सुवर्णपदक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. स्वभावाने अत्यंत नम्र , सुसंस्कारी आणि मनमिळाऊ अशी स्पृहा शाळेत सर्वांची लाडकी आहे. तिच्या यशाचा संपूर्ण शाळेला सार्थ अभिमान आहे . स्पृहाच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव श्री पी. पी. सोमलवार , मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली डाखोळे, उप-मुख्याध्यापिका डॉ. शुभ्रा रॉय आणि प्रभात शाखा प्रमुख श्रीमती श्वेता पवनीकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
ALUMNI SPEAKS
Contact Us
Central Bazar Road, New Ramdaspeth, Ramdaspeth, Nagpur, Maharashtra 440010, India
0712 242 4950